June 29, 2025 9:33 am

पणदरे येथील प्राथमिक विद्या मंदिरा मध्ये सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी….

अपनी भाषा में पढ़े! Translate

पणदरे येथील प्राथमिक विद्या मंदिरा मध्ये सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी….

बारामती (सह-संपादक – संदीप आढाव)
बारामती तालुक्यातील पणदरे येथील सरस्वती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विद्या मंदिरा मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक हेमंत बारवकर सर व इयत्ता चौथी च्या मुलींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हेमंत बारवकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला तसेच विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून मनोगते सादर केली. इयत्ता चौथी च्या विद्यार्थिनींनी प्रामुख्याने सहभाग घेऊन त्यांनी ओव्या गायनाचे सादरीकरण केले. तसेच नृत्य सादर केले…
यावेळी मान्यवरांसोबत पुष्पलता नींबाळकर, उषा गायकवाड, कालिदास् देवकर, पल्लवी खलाटे, चित्रा जगताप, अर्चना भोसले आदी शिक्षक व विद्यार्थी यांचे पालक उपस्थित होते…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!