January 7, 2025 1:53 pm

‘प्रताप मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील कार्यालयात आज सकाळी ११:३० वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रगीत नंतर सभा घेण्यात आली. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापिका, प्राध्यापक व शिक्षकेतर वृद्ध उपस्थित होते. डॉ.वंदना पाटील व प्रा. शालिनी पवार यांच्या हस्ते क्रांतीवज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, डॉ.अमित पाटील, डॉ.व्ही.बी.मांटे,डॉ.कल्पना पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. या यावेळी उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, त्यांचे विचार व कार्यांना आजच्या संदर्भात उजाळा देण्याचा प्रयत्न केले.

प्रस्तुत अभिवादन सभेच्या नियोजनात प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,डॉ.धीरज वैष्णव यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!