शहरातील राजाराम नगर येथे क्रांती-ज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठया उत्साहात साजरी
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील राजाराम नगर येथे क्रांती-ज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरा करण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी राजाराम नगरमध्ये अनेक वर्षांपासून रहिवास असलेले आदिवासी कुटुंबातील मालुबाई भिल यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तसेच परीसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंचा कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला व दाऊद दादा पिंजारी (विधी तज्ञ) यांनीही आपल्या भाषणातून सावित्रीमाईंनी समाजासाठी दिलेलं योगदानावर आपले विचार मांडून उपस्थित परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी राजाराम नगर मधील सामाजिक कार्यकर्ते तथा पिंटूभाऊ गुजर,रविभाऊ संदानशिव, एस.एम.दादा पाटील,प्रकाशदादा शिंदे,सुनील बैसाणे सर,प्रदीप दादा जाधव,किशोर दादा महाजन,पंकज भाऊ भावसार,रवि चौधरी, गणु चौधरी, गुलाब पेंटर,नितीन महाजन,गजू मराठे,रझाक दादा,अभिजित महाजन,सोनु मेहतर,विक्की चौधरी,अनिल पाटील आदींनी मेहनत घेतली तर मनोज माळी सर यांनी सूत्रसंचालन व निलेश पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले.