ऊस वाहतुकीची वाहने गाण्यांचे आवाज सुसाट; मदनवाडी ग्रामस्थांनी घेतला चोप देण्याचा पवित्रा
(निलेश गायकवाड)
गावातील रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने डिजे साऊंड वर गाणे वाजवत जात असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन या बाबींकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
गावासह परिसरातून रात्रंदिवस विविध कारखान्याचे ऊस भरलेले वाहने मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त ऊस त्याप्रमाणे वाहनांवर लावलेले डीजे साऊंड वर मोठ्या आवाजात उडत्या चालीची गाणी रात्रंदिवस वाजवली जात असल्याने अपघाताची भीती आहे.
अनेक वेळा वाहनातून उसाच्या मोळ्या पडतात. त्यामुळे दुचाकी वाहनधारक,सायकल स्वर,पादचारी यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. वाहन चालक कमी खर्चात जास्त ऊस नेण्याचा प्रयत्न करतात.तर कारखान्यावर नंबर लावण्यासाठी भरलेली वाहने व रिकामी वाहने भरधाव पळवली जातात. यामुळे रस्त्यावर उसाच्या मुळ्या पडणे वाहने उलटणे असे प्रकार होतात. तर बऱ्याच वेळेला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी वाहनधारक ट्रॅक्टर वर आढळतात संबंधित कारखान्याने वाहनधारकांना गाण्याचा आवाज आणि वाहनांची गती कमी करण्याची सूचना द्याव्यात. मदनवाडी चौकातील तसेच तक्रारवाडी चौकातील ग्रामस्थांनी वारंवार याबद्दलची ट्रॅक्टर वाहतूक करणारे ड्रायव्हर यांना सांगून देखील जाणून बुजून गाण्याचा आवाज सोडत गावातील रस्त्यावर बेधुंदपणे वाहने चालवत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत असल्याचे सांगत ट्रॅक्टर मध्ये असलेले साऊंड सिस्टिम फोडण्यात तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला चोप देण्याची मानसिकता होऊ लागली आहे अनेक ट्रॅक्टर चालकांना सूचना दिले आहेत आवाजामुळे इतर वाहनांच्या चालकांना पाठीमागून वाहन असल्याचे लक्षात येत नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. वाहन धारकांनी मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत तशी परवानगी नाही. वानधारकांना मर्यादा नियम पाळले पाहिजेत . पण याकडे सर्रास वाहन चालकांकडून नियमांचे भंग केले जात आहे.
यासंदर्भात सर्व वाहनधारकांना कडक सूचना देण्यात आले आहेत कारखान्यावर ध्वनीक्षेपणावरून त्याचप्रमाणे लेखी पत्र देऊन कर्कश आवाजात गाणी न वाजवणे वेग कमी करणे आदी सूचना दिल्या आहेत.
-भिगवण सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे