पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे अपघातग्रस्त महिलेला जिवदान –
बारामती (प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे निरा – बारामती या राज्य मार्गावर कवठेकर वस्ती हाॅटेल सचिन शेजारी अर्चना शांताराम गायकवाड (वय -३८ रा.शारदानगर) या स्कुटी वरुन मुलगा व मुलगी असा प्रवास करत असताना दगडावरुन गाडी घसरुन त्यांच्या डोक्याला मार लागुन रक्तस्राव झाला होता.त्या रस्त्यावर पडुन होत्या.
याचवेळी पत्रकार संदीप आढाव सर व सामाजिक कार्यकर्ते बाबु वाघमोडे हे बारामतीकडे चालले असताना त्यांनी स्वतःच्या चार चारचाकी वहानात जखमी अनिता गायकवाड यांना बारामती येथील डॉ.सुनिल पवार यांच्या पवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले व त्या शुद्धीवर आल्या आहेत.सुदैवाने या अपघातात त्यांच्या मुलांना इजा झाली नाही.
दरम्यान सध्या माणुसकी हरवत चालली असताना पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनिता गायकवाड यांना जिवदान मिळाल्याने दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.