November 21, 2024 2:22 pm

माझ्या येण्याने जर चर्चा होत असेल तर चर्चा” ती झालीच पाहिजे.. प्रकाश भाई पाटील.

अपनी भाषा में पढ़े! Translate

माझ्या येण्याने जर चर्चा होत असेल तर चर्चा” ती झालीच पाहिजे.. प्रकाश भाई पाटील.

 

विक्की जाधव : मार्मिक स्पेशल मुलाखत.

माझ्या येण्याने जर चर्चा होत असेल तर ती झालीच पाहिजे असा मार्मिकशी बोलतांना त्यांनी खुलासा केला. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मार्मिकशी तें चर्चा करत होतें. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. 

 

अमळनेर तालुक्याचे राजकारण सध्या सत्तेसाठी लाचार झाले असुन सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करू कुठेतरी दूर जाऊन सेटलमेंट करून घ्यायची. आणि आपली राजकीय पोळी भाजून जनतेस अंधारात ठेऊन स्वतः मात्र लाभार्थी व्हायचे हें कोढे अमळनेरची जनता येत्या विधानसभा निवडणुकीत लवकरचं सोडवेल अशी चर्चा तालुक्यातील जनतेत चालू आहे.

तर घुडघ्याला बाशिंग बांधून मीचं” आमदार होणार. अशी भाषा करणाऱ्यासाठी प्रकाश भाई पाटील हें एक आदर्श दिशादर्शक ठरू शेकतात सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना रोजगार देऊन कळत न कळत त्यांनी अमळनेर चां पाया विकांसाच्या दृष्टीने रोवाला आहे. तर वर्षानुवर्षे अमळनेर तालुक्यातील राजकीय पोळी भाजणाऱ्यानां ही एक चपराक आहे. 

 

मार्मिक ने घेतलेली प्रकाश भाई पाटील यांची सविस्तर मुलाखत पुढे वाचा..

प्रश्न : आपल्याकडे राजकीय दृष्टिकोन आणि विशिष्ट पक्षाचा सिम्बॉल ने बघितले जात आहे आपण काय सांगाल.

अमळनेर तालुका विकासाच्या दृष्टीकोनाने खूपच मागासलेला आहे. येथील लोकप्रतिनिधी जनतेला विश्वासात घेत नसून, आपल्या विधानसभा क्षेत्रातून जणतेने असा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा जो पाच वर्ष जनतेत असुन सामान्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी परिपूर्ण असावा.

 

प्रश्न : मग आपण ही विधानसभा लढावणार कां.?

भुलथापा मारून आमदारकी लढवावी अशी माझी कदापि इच्छा नाही. मी परिपूर्ण धन-संपन्न आहे. माला पदाची लालसा मुळीच नाही.  मला जर आमदारच व्हायचे होते तर मी विधान परिषद (Member of Legislative Council) मधून आमदार झालो असतो.

(Member of Legislative Council). विधान परिषद ही काही राज्यांची द्विसदनीय विधिमंडळाची उपरी सदन असते. 

प्रश्न : मग तुमचा उद्देश काय..?

राजकारण आमच्यासाठी प्राथमिकता नाही हे अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे ध्येय आणि आवडी असतात आणि राजकारण हे त्यापैकी एक असू शकतें असे ही प्रकाश भाई बोलत होतें तें पुढे म्हणाले कीं

“मला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नाही. माझे लक्ष व्यवसायावर केंद्रित आहे.” “मी व्यवसायाच्या क्षेत्रात सक्रिय आहे आणि माझे सर्व लक्ष याच क्षेत्रात केंद्रित आहे. सद्या राजकारणात भाग घेण्याचा माझा कोणताही उद्देश नाही.”

प्रश्न : मग इतकी उठाठेव कशासाठी..?

मला अमळनेर भूमी साठी काही तरी करायचे असून मी रोजगारासाठी युपी- बिहार येथून कामगार आणण्यापेक्षा माझ्या खान्देशवासी अमळनेरकर विविध गुणांनी संपन्न असणाऱ्या तरुणास रोजगार देऊन सक्षम करत आहे. भविष्यात विदेशातही अमळनेर च्यां या तरुणांना संधी असेल. असे ही तें म्हटले.

 

प्रश्न : मागील काही दिवसात तुमची आणि शरद पवार यांची भेट झाली काय चर्चा होती..?

हो नक्कीच मागील काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे एका कार्यक्रमात शरद पवार साहेब आणि माझी भेट झाली असून कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत .

तद:पूर्वी तें, हें ही. म्हटले कीं माला अमळनेर च्यां जनतेने विकासाच्या मुद्यावर स्वीकारले तर मी फक्त सहा महिन्यात अमळनेर तालुक्याचे चित्र बदलून दाखवेल.

यावेळी त्यांना अमळनेर तालुक्यातील राजकारणावर प्रश्न केला तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला तर माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त महिती आहे असे बोलून प्रकाश भाई यांनी ह्या प्रश्नाचे खंडण केले.

क्रमश : 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!