बारामती येथे अंकिता पाटील ठाकरे यांना अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान
-अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनी कार्यक्रम संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी. भगवान लोंढे. . दि.14/8/24.
बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 229 व्या स्मृतिदिना निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांना अहिल्यारत्न पुरस्कार भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.13) प्रदान करण्यात आला.
सकल हिंदू समाज व मल्हार क्लब बारामती यांच्या वतीने नटराज नाट्य कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन अंकिता पाटील ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आ.अमित गोरवे, भाजपचे राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना रयतेचे हित जोपासणारे सामाजिक व धार्मिक अधिष्ठान होते, त्यांचे विचार आपणा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आहेत, असे गौरोदगार अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी काढले.