दौंड शहर व तालुक्यातील मोबाईल नेटवर्क टॉवर व मोठ्या होर्डिंग चे तपशिल द्या.-दौंड तालुका काँग्रेस कमिटीची मागणी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौड शहरामध्ये मोबाईल टॉवरचा सुळसुळाट सुरू आहे. दौड नगरपालिकेने आजतागायत किती लोकांच्या इमारतींना टॉवर लावण्यासाठी परवानगी दिली व एकुण मोबाईल टॉवर संख्या किती आहे. तसेच मोबाईल टॉवर मालकांनी आजपर्यंत आपल्या दौंड नगरपालिकेला टॉवर लावल्यानंतर नियमानुसार कर भरला आहे का?व किती भरला? त्या टॉवरचे किती ऑडीट झाले आहे? वा टॉवरमुळे होणारे दुष्परिणाम (फ्रिक्वेन्सी तिव्रता) व त्याची माहिती संबंधीत टॉवर मालकाने आपल्या बिल्डींग आवारात त्याचे बोर्ड लावले आहेत का? तसेच टॉवर मालकांनी आपल्या इमारतीमध्ये बसविलेला टॉवर हा कालनिहाय योग्य स्थितीत असल्याची खात्री ऑडीट केले आहे का , व जर केले असेल तर कागदोपत्री पुरावा आपल्याकडे जमा केला आहे? असल्यास तो जाहीर करावा तरी वरील सर्व प्रश्नाबाबत ज्या मोबाईल टॉवर इमारतधारकांनी हलगर्जीपणा अथवा अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केली असेल तर या सर्व लोकांवरती कायदेशीर कारवाई केल्याची माहिती लेखी स्वरूपात आम्हांला देण्यात यावी तसेच दौंड तालुक्यातील संपूर्ण मोबाईल टॉवर इमारत धारकांची संपूर्ण/कारवाई यादी आम्हांला येत्या १५ दिवसात देण्यात यावी. तपशिल आम्हांला प्राप्त न झाल्यास, आपले नगरपरिषद प्रशासन व टॉवरधारक इमारत मालक यांचे लागेदोरे असल्याचे समजले जाईल व दौड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, व निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबीस आपणच प्रशासन जबाबदार असाल, असा इशारा देण्यात आला. असे निवेदन दौंड नगरपालिका व दौंड तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी युवक अध्यक्ष संजय पठारे , महेश जगदाळे किसान मोर्चा , रज्जाक शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष, अतुल थोरात शहर सचिव, प्रकाश सोनवणे महासचिव दौंड तालुका कॉंग्रेस कमिटी उपस्थित होते.