‘ प्रताप’ मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा….
अमळनेर : विक्की जाधव.
येथिल प्रताप महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात दि.०९.०८.२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता जागतिक आदिवासी दिन,क्रांती व ग्रंथालय दिन निमित्ताने प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी डॉ.रंगनाथन,महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.या प्रसंगी संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव, ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.शशिकांत सोनवणे, ग्रंथपाल दिपक पाटील,उप प्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.विजय तुंटे, डॉ.कल्पना पाटील,डॉ.अमित पाटील,प्रा.व्ही बी मांटे, डॉ.वाय व्ही तोरवणे, प्रा.जे.सी.अग्रवाल,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.आर सी सरवदे,डॉ.अशोक पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.कैलास निळे,प्रा.विजय साळुंखे,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.रमेश माने,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.महेंद्र महाजन,डॉ.वंदना भामरे,डॉ.किरण गावित,प्रा.मुरलीधर वसावे,डॉ रविंद्र मराठे,प्रा.जयेश साळवे,नरेंद्र सातपुते,रविंद्र माळी,संदीप बिऱ्हाडे,नितीन सोनार,दिनेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.शशिकांत सोनवणे यांनी महानायक बिरसा मुंडा व डॉ.रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकले आणि ग्रंथालयास २१ वी सदी का आदिवासी हिंदी साहित्य हे ग्रंथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांना भेट दिले.