करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुका हा विविध क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. आज पर्यंत तालुक्याने सर्वच बाबतीत आपला अलौकिक ठसा कायम महाराष्ट्राच्या मनावर कोरून ठेवला आहे. पूर्वीच्या काळी करमाळ्यात रेवडी हा पदार्थ खूप प्रसिद्ध होता. त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असायची. आत्ता वडापाव ने करमाळ्यातील बाजार पेठ चर्चेत येऊ लागली आहे.
करमाळा येथील बायपास (श्री देवीचा माळ) लगत चुलीवरचा वडापाव या शाखेचे उद्घाटन युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्या हस्ते झाले आहे. चुलीवर बनवलेला कोणताही खाद्य पदार्थाची चव उत्तमच असते.
तुषार चांदगुडे यांनी चुलीवर बनवण्याची आपली पारंपारिक पद्धत जपत लोकांना एक वेगळा अनुभव मिळवून देत आहेत.चुलीवर तयार केलेल्या वडापाव ची चव न्यारी असल्याने व खमंग अशा वडा पाव कडे खवय्यांचा ओघ दिसून येत आहे. त्यामुळे चुलीवरच्या वडापावाची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे.
सदरच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, साळुंके सर,उद्योजक विकी शिंदे,वरकटणे चे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे,विशाल पाटील