January 30, 2025 11:54 pm

खाकी डागांळली” पोलीस उपनिरीक्षकास पैसे घेणे भोंवले..

अपनी भाषा में पढ़े! Translate

खाकी डागांळली” पोलीस उपनिरीक्षकास पैसे घेणे भोंवले..

 

अमळनेर : विक्की जाधव.

गुटख्याची तस्करी करणारे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र फोन पे वर ९६ हजार रुपये घेणे भोंवले, पैसे घेऊन वाहन सोडून देणाऱ्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. या संदर्भात काल सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कार्यवाही चे आदेश काढले असुन. पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून मुक्ताईनगर मार्गे इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतुक केली जाते. दरम्यान, (एमएच ०२, बीएम ८४२५) क्रमांकाच्या चारचाकी वाहतून भुसावळ येथे गुटखा वाहतुक करणारे वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांनी पैसे घेवून वाहन सोडून दिले होते.

तेच वाहन मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थांबवले. यां संशयास्पदरित्या जाणाऱ्या वाहनातून गुटखा तस्करी होत आहे असे आढळून आल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ते वाहन पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयात आणली. त्या वाहनातून सुमारे ४ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख (रा. भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदारांनी केलेल्या तक्रारीची पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मुक्ताईनगर विभागाचे पोलीस उपअधीक्षकांनी चौकशी करुन त्या पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांचा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला. त्या कसुरी अहवालावरुन त्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ गजानन महाजन, पोकॉ डिंगबर कोळी, निखिल नारखेडे, सुरेश पाटील यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच त्यांची प्राथमिक चौकशीचे आदेश फौजपुर पोलीस उपअधीक्षकांकडे यांना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जळगांव जिल्ह्यात पोलीस दलात एकच खळबळ माजली होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!