अमळनेर येथील ताडेपुरा येथे महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ताडेपुरा कांजरवाड्यात एक महिला ८ रोजी दुपारच्या सुमारास घरी असताना तिच्या घरासमोर मीनाक्षी सूरज
कँजर, नितीन साजन तमाईचे, सचिन साजन तमाईचे तुषार सूरज गुमाणे, सुमनबाई नितीन तमाईचे, रोमा सचिन तमाईचे, नैना रोहित बाटुनगे, बेलाबाई कंजर, प्रिया गणेश बागडे, गब्बूबाई बागडे, नरेंद्र कोचरे गुमाणे, प्रितेश
बागडे हे शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व चापटानी फिर्यादी महिलेला मारहाणकरू लागले . मिनाक्षीने काठीने मारहाण केली. त्याचवेळी तिची चुलत सून आली असता नितीन व सचिन यांनी तिचे दोन्ही हात धरून तुषार याने विनयभंग केला. मिनाक्षीने फिर्यादी महिलेची सोन्याची चेन तोडून घेतली. अशी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणयात आला असून पुढील तपास पो. हें.कॉ गणेश पाटील करीत आहेत.