वारी यूपीएससीची
अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात उत्तीर्ण झालेल्या आयएएस, आयएफएस,आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांनी २०१७ पासून एक उत्कृष्ट अभियान हाती घेतले आहे या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यूपीएससी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. यावर्षी 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण नवोदित अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात वारी यूपीएससी या अभियानांतर्गत मार्गदर्शन करणार आहेत.२०२४ च्या वारीचे नेतृत्व मार्गदर्शक म्हणून याच वर्षी आयपीएस पदी निवड झालेले सागर भामरे, आयआरएस पदी निवड झालेले प्रितेश बाविस्कर तसेच आयडीएएस पदी निवड झालेले हिमांशू टेंभेकर करणार आहेत.शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथून सकाळी ११.०० वाजता वारीला सुरुवात होईल.१३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कला,वाणिज्य व विज्ञान महविद्यालय चाळीसगांव येथे सकाळी १०.०० वाजता व एम. एम. कॉलेज पाचोरा येथे सकाळी १० वाजता वारी पोहचेल. १६ ऑगस्ट रोजी वारीचा समारोप डीगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय एरंडोल येथे होणार आहे.
माजी आयआरएस अधिकारी डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून वारी यूपीएससीची हे अभियान २०१७ पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात गेल्या सहा वर्षांपासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे.वारी मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी उत्कृष्ठ मार्गदर्शन होते. युपीएससी परीक्षा विषयी विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक समस्यांचे निराकरण नवोदित अधिकारी करीत असतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होते.
प्रा. राजेंद्र चिंचोले पाचोरा, प्रवीण पवार चाळीसगाव,विजयसिंग पवार अमळनेर व जगदीश पाटील एरंडोल हे वारी युपीएससी या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.