करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहर व ग्रामीण भागामध्ये बनावट दारू विक्री होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की, करमाळा शहर व ग्रामीण भागात कोर्टी, साडे, कंदर, केम, जेऊर अशा मोठ्या गावांमध्ये व शहरातील हाॅटेलमध्ये बनावट दारुची विक्री होत आहे. या बनावट दारुमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. याकडे उत्पादन विभागाचे अधिकारी कारवाई करण्याबाबत दूर्लक्ष करत आहेत. ताबडतोब याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा करमाळ्या मनसे स्टाईलने आंदलन करण्यात येईल.
बनावट दारु स्वस्तात घेऊन भरमसाट नफा कमवला जात आहे. यातून तरुणही व्यसनाधीन होत आहेत व सरकारचा महसूलही बुडत आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. तपासणी करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते स्वतः मनसे स्टाईलने कारवाई करतील, असा इशारा ही यावेळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिलेला आहे.