February 23, 2025 4:38 am
न्यूज
ब्रेकिंग

दूध संघांनी शेतकऱ्यांची लावलेली चेष्टा खपवून घेणार नाही – प्रशांत शिंदे

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- राज्य सरकारने दि. १ जुलै पासून शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर दर ३० रू आणि अनुदान ५ रू. देण्याचे राज्यातील प्रत्येक दुध संघाला बंधनकारक केलेले असताना संघ ११ जुलै पासून शेतकऱ्यांना दुध दर हा ३० रू देण्यात आला आहे.
१ जुलै ते १० जुलै पर्यंत चे दुध दर आणि अनुदान लाटण्याचा प्रकार दुध संघाचा दिसत आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालुन शेतकऱ्यांना १ जुलै ते १० जुलै पर्यंत चा दुध दर आणि अनुदान देण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही. असे मत शेतकरी कामगार नेते प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने दि १फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान जाहीर केलेले अनुदान योजनेचे अनुदान देखील आणखी मोठ्या प्रमाणातशेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाहीत. सदर काळातील अनुदान हे लवकरात लवकर जमा करावेत. जेणे करुनशेतकऱ्यांचा तोट्यातील दुध धंदा चालवण्यास मदत होईल. दुध धंदा बऱ्यापैकी चालवण्यासाठीशेतकऱ्यांना किमान ४० रू भाव दुधाला देणे गरजेचे आहे. परंतु शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही. म्हणुनशेतकऱ्यांच्या मुलभुत प्रश्नाकडे लक्ष न देता शेती आणि शेती पुरक व्यवसाय तोट्यात चालला आहे.
१ फेब्रुवारी ते १० मार्च आणि १ जुलै ते १० जुलै पर्यंत चे दुधाचे दर आणि अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत यासाठीचे निवेदन मा. मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री यांना निवेदन पाठवले आहेत. याप्रसंगी सचिन बरडे, अशोक भुजबळ, आण्णा शिंदे, महेश भुजबळ, देविदास बरडे, सचिन शिंदे अर्जुन पाडुळे , आदी शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!