तरुणांना संधी देत पवार साहेब ॲक्शन मोडमध्ये तर अमळनेर कडे विशेष लक्ष असून दिलेल्या शब्द माघारी नाही.
अमळनेर : विक्की जाधव.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. अशातच शरद पवार यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे.
विधानसभेला २० मतदारसंघात शरद पवार हे तरूण-युवकांना संधी देणार आहे. इतकंच नाहीतर शरद पवार हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
२० मतदारसंघात शरद पवार ज्या तरूण-युवकांना मैदानात उतरवणार आहेत, यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत. विधानसभेतील या २० मतदारसंघात अहेरी, आष्टी, दिंडोरी, अमळनेर, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती यासारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे.
तर शरद पवार साहेबांचे अमळनेर विधानसभेकडे विशेष लक्ष लागून.
शरद पवार साहेब यांचे अमळनेर कडे विशेष लक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आगामी विधानसभा निवडणुकीत अमळनेर विधानसभा मतदार संघात कोण उमेदवार तुतांरी वाजवणार हे जरी अजून नक्की नसले तरी एक- दोन नव्हे तर तीन- तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तिकीट घेण्यास इच्छुक आहेत. सध्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असलेले अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत जाऊन राष्ट्रवादीमधून बंड करुन भाजपा व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हटले होते की, “पुढच्या विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत”. असे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.
या वक्तव्यावर शरद पवार ठाम असून अमळनेर विधानसभा क्षेत्रावर शरद पवार यांचे विशेष लक्ष लागून आहे. या संदर्भात त्यांची चाचपणी सुरू असून कोणता उमेदवार द्यावा हे येणाऱ्या काळात समोर येईलचं.
तत्पूर्वी वाचत रहा मार्मिक समाचार..