June 29, 2025 3:25 am

दादागिरी व चोप देण्याची भाषा करणाऱ्यांना शाम पाटील यांनी आपल्या शैलित दिला चोप..

अपनी भाषा में पढ़े! Translate

दादागिरी व चोप देण्याची भाषा करणाऱ्यांना शाम पाटील यांनी आपल्या शैलित दिला चोप..

 

अमळनेर : विक्की जाधव. 

अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने इंदिरा भवन येथे नगरपरिषदेचे कर्मचारी बसवून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना प्रभावशालीपणे राबविण्यासाठी व अर्ज करतांना महिलांना मदत मिळावी म्हणून व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी नामदार अनिल पाटील यांचे फोटो छापून अर्ज वाटप केले जात असल्याची माहिती शाम पाटील यांना तिथे अर्ज करायला आलेल्या महीलेकडूनच मिळाली आणि ते अर्ज भरून जमा केल्यानंतर कदाचित बाद तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली मी त्याठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतली असता मला देखील त्यात थोडी शंका वाटली हे साहजिक होते परंतु शासनाच्या नियमांचे पालन व तंतोतंत अमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आणि मंत्री महोदयांवर आहे तेच जर अश्या प्रकारे नियम मोडणार असतील तर ही व्यवस्था कशी टिकणार.?

 

माननीय आमदार मंत्री अनिल पाटील यांचे काही सहकारी आम्ही योजनेला विरोध करीत असल्याचा गैरसमज पसरवून चोप देणार असल्याची भाषा करीत आहेत.

परंतु चोप देण्याची भाषा करणाऱ्यांना माझा जाहीर सवाल आहे २०१६ मध्ये नगरपरिषदेचे मतदान सुरू असताना नामदार अनिल पाटील यांना धक्काबुक्की झाली त्या दिवशी यांची दादागिरी कुठे होती…? चोप देण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी आमचा इतिहास तपासून बघावा मग तशी भाषा करावी अन्यथा आम्हाला त्यांचा इतिहास उजेडात आणावा लागेल

अमळनेर तालुका हा क्रांतीचा संदेश देणाऱ्या डॉ.उत्तमराव आणि लीलाताई पाटील यांचा आहे तसाच तो प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून देखील ओळखला जातो आणि या तालुक्यात जे दादागिरी व चोप देण्याची भाषा करतात त्यांना सुसंस्कृत मतदार आपल्या कृतीतून कसे उत्तर देतात ते आपण मागील काही निवडणुकांमध्ये बघितलेच आहे. असे श्याम जयवंतराव पाटील शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी म्हटले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!