June 30, 2025 1:19 am

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी 8 सफाई कामगारांच्या रिक्त असलेल्या जागावर दिली वारसा नियुक्ती. तर कर्मचारी संघटनांतर्फे निर्णयाचे स्वागत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी 8 सफाई कामगारांच्या रिक्त असलेल्या जागावर दिली वारसा नियुक्ती. तर कर्मचारी संघटनांतर्फे निर्णयाचे स्वागत.

अमळमेर : विक्की जाधव.

माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर व सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या शासन निर्णयानंतर  अमळनेर नगर परिषदेत लाड व पागे समितीच्या  वारसा पद्धतीनुसार प्रथमच नेमणुका
माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथील दिवाणी अर्ज क्रमांक 2023 /15434 मधील रिट याचिका 3950/2023 गोपाल मकूलाल बिऱ्हाडे व इतर विरुद्ध कैलास मारोती राजकोर या केस मध्ये जस्टीस घुगे व जस्टीस खोब्रागडे यांच्या खंडपीठाने प्रदीर्घ अभ्यास करून 1975 पासून सुरू सुरू असलेला शासन स्वीकृत लाड पागे समितीच्या निर्णयानुसार मागासवर्गीय शेड्युल कास्ट च्या सफाई कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या वारसा पद्धतीने नेमणुकांच्या बाबत स्थगिती आदेश उठऊन मागासवर्गीय 59 जातींपैकी 56 जातींना न्याय देऊन त्यांचा लाड व पागे समितीच्या शिफारिशनुसार नेमणूक देण्याचा मार्ग मोकळा केलेला होता.
सदरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील दि. 12/7/2024  राज्यातील अनुसूचित व जाती नवबौद्धंसह सफाई कामगारांच्या वारसांना नेमणुका देण्याचे आदेशित केले. तर आज दि. 25/7/2024 माननीय मुख्याधिकारी श्री तुषार जी नेरकर यांनी 8 सफाई कामगार च्या रिक्त असलेल्या सफाई कामगार या पदावर सफाई कामगारांच्या वारसास नेमनुक दिल्या असुन सफाई कामगारांच्या व मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय तुषार जी नेरकर साहेबांचा सत्कार करण्यात आला.
सदर ऐतिहासिक प्रसंगी आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे सह माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव, ज्ञानेश्वर संदानशिव, गोपाल बिऱ्हाडे, गोल्डी बिऱ्हाडे, गोपाल गजरे, मेजर विनोद बिऱ्हाडे, राजेंद्र संदानशिव, अविनाश संदानशिव,भरत सोनवणे यांचेसह मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते.
या नेमणुका मिळवून देणे कामी समाजातर्फे व कर्मचारी संघटनांतर्फे माननीय मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांचे आभार मानण्यात आले

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!