June 30, 2025 1:20 am

तब्बल 5 कोटी 76 लाख रु निधी मंजूर केल्याबद्दल दत्तात्रय भरणे यांचे मानले मदनवाडी ग्रामस्थांनी आभार

अपनी भाषा में पढ़े! Translate

तब्बल 5 कोटी 76 लाख रु निधी मंजूर केल्याबद्दल दत्तात्रय भरणे यांचे मानले मदनवाडी ग्रामस्थांनी आभार

(निलेश गायकवाड)

मदनवाडी येथील पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती पर्यंतच्या जवळपास तीन किलोमीटर अंतराचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये समाविष्ट करून घ्या व ग्रामस्थांच्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने गरजेचे असणारा हा रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मदनवाडी येथील शिष्टमंडळाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती.

यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी मदनवाडी येथील शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळत तब्बल 5 कोटी 76 लाख रुपये मंजूर केला. मदनवाडी गावच्या खूप दिवसापासून प्रलंबित असलेला हा रोड गावाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रोड असल्याने भरणे यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. निधी उपलब्ध केल्याबद्दल मदनवाडीच्या शिष्टमंडळाने व ग्रामस्थांनी भरणे यांचे आभार मानले

मदनवाडी गावचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर,मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आबासाहेब देवकाते,माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते,अजिनाथ सकुंडे चेअरमन विष्णुपंत देवकाते,रामदास बंडगर,प्रमोद बंडगर,समीर बंडगर अनिल कायगुडे,महादेव वनवे, तात्या बंडगर, अध्यक्ष सतीश शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य सतीश सकुंडे राजू कुदळे,अण्णा ढवळे,मारुती बंडगर, मनू सकुंडे, अनिल रानवरे रवी सकुंडे, आनंद देवकाते आदींनी भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.

गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन उपयोगासाठी हा रस्ता सर्वाधिक उपयोगी आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाची सोय लक्षात घेऊन श्री भरणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ दिलेला शब्द पाळला . मदनवाडी ग्रामस्थांनी व शिष्टमंडळ यांनी भरणे यांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!