प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राइव्ह अंतर्गत निवड.
अमळनेर : विक्की जाधव.
येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची दि. २० जून २०२४ रोजी ऑन कॅम्पस ड्राइव्ह अंतर्गत SRRS Solutions Pvt. Ltd. मुंबई या आय.टी.कंपनीत ‘असिस्टंट सॉफ्टवेअर डेव्हलपर’ म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कु.सेजल जैन, कु. अश्विनी पाटील, कु.जोत्स्ना पाटील, कु. सागर पाटील यांचा समावेश आहे.
प्रस्तुत निवडीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी वाणी,डॉ.अनिल शिंदे,योगेश मुंदडे, प्रदिप अग्रवाल,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन तसेच उपप्राचार्य प्रा.पराग.पी पाटील, प्रा.डॉ.विजय तुंटे,प्रा.कल्पना पाटील, डॉ.अमित पाटील,प्रा.विजय मांटे,प्रा.योगेश तोरवणे,डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा.वृषाली वाकडे, गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ.मुकेश भोळे,परीक्षा व मूल्यमापन केंद्राचे संचालक प्रा.शशिकांत जोशी,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,प्रा.विवेक बडगुजर,प्रा.रामभाऊ सुरळकर,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे,भटू चौधरी,विजय ठाकरे,योगेश बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे व संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख व सहकारी प्राध्यापकांचे कौतुक व अभिनंदन केले.
सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. पुष्पा पाटील, प्रा.अमित शिंदे, आणि प्रा. नेहा आगलावे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या विद्यार्थ्यांना ही महत्वपूर्ण संधी प्राप्त झाली आहे. प्रताप महाविद्यालयाचे संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थी आय. टी. क्षेत्रात आपले भविष्य उज्ज्वल करीत आहेत आणि त्यांच्या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाला या यशाचा अभिमान वाटतो.