June 29, 2025 8:22 am

कळमसरे येथे कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या

अपनी भाषा में पढ़े! Translate

कळमसरे येथे कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या

 

अमळनेर : विक्की जाधव. 

तालुक्यातील कळमसरे येथील सुनील मधुकर पाटील (वय -41) या तरुणाने आज ता. 18 रोजी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली.

सनील पाटील हा श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. त्या घराला लागत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओट्यावरील संडास मध्ये जात दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील पाटील यांनी रात्री गळफास घेतला होता. सकाळी मुले उठल्यावर त्यांच्या वडिलांना शोधायला लागल्यावर त्यानी गावात नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केली. मात्र आज दुपारपर्यंत सुनील मुलांना त्याच्या भावाला कुठेच दिसून आला नाही. जिल्हा बँकेत दुपारी कर्मचारी प्रसाधन गृहात गेल्यावर सुनील याने फासी घेतल्याचे दिसून आले. सुनील पाटील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. स्वतः हातावार स्वयंपाक करून खाऊ घालत होता. त्याच्यावर कर्ज झाल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शेती व मजुरी तो करीत होता. नापीकी व बचत गटाचे कर्ज यामुळे तो नैराश्यात होता. मुलांचे आई व वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता. ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविछेदन केले. नारायण पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील पाटील यांच्यावर सायंकाळी साडे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पच्यात आई वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!