मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्मटोकन वर मंत्री अनिल पाटील यांचा फोटो असल्याने शाम पाटील यांनी केला निषेध. तर जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार लेखी तक्रार.
अमळनेर : विक्की जाधव
सद्या संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले जात आहेत २१ ते ६० वयवर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे.
तर मागील काही दिवसात अमळनेर न. प. कर्मचार्यांकडून मंत्री अनिल पाटील यांचे छायाचित्र असलेले फॉर्म वाटप करण्यात येत आहेत. परंतु योजना शासनाची अन फोटो मात्र लाडक्या भावाचा?? नको गं बाई.. आशा काही महिलांच्या प्रतिक्रिया होत्या.
योजना शासनाची परंतु फोटो मात्र लाडक्या भावाचा फक्त फोटोसाठीचं का? हा अट्टाहास.
जनतेस नको असलेल्या भावाच्या फोटोवरून लाडक्या बहिणींमध्ये असंतोष तर शाम पाटील यांनी घेतला आक्षेप.
महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहिण योजनेसाठी अमळनेर नगरपरिषदेच्या इंदिरा भवन येथील शासकीय केंद्रावर मोफत अर्ज भरण्याची व्यवस्था अमळनेर नगर परिषदे कडून केली आहे.
परंतु या केंद्रावर मंत्री अनिल पाटील यांचे छायाचित्र असलेले अर्ज महिलांच्या हातात दिसून आले असुन लाडक्या भावाने फक्त फोटोसाठीचं का? केला होता हा अट्टाहास. असे जनमानसातून बोलले जातं आहे. याबद्दल शरदचंद्र पवार गटाच्या शाम पाटील यांनी केंद्रात धडक देऊन यावर आक्षेप घेतला आहे.
शासनाने सुरु केलेल्या केंद्रावर अशा पद्धतीने नगर परिषदेच्या कर्मचार्यांकडून मंत्री अनिल पाटील यांचे छायाचित्र असलेले अर्ज वाटण्यात येत असल्याचा त्यानी निषेध केला असुन सदर अर्ज नामंजूर झाल्यास लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहू शेकते महिलांनी शासकीय अर्ज भरावे असे आवाहन त्यांनी महिलांना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेरील केंद्रावर कोणी अर्ज भरण्याचे पैसे घेत असल्यास त्याची तक्रार करा अशा सूचना देखील दिल्या आहेत.
नियोजन नसल्याने महिलांचे होत आहेत हाल.
राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली असुन, योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी दिसत आहे. या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे. या योजनेतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रूपये मिळणार आहेत.