June 29, 2025 4:56 am

माळेगाव येथे खळबळ…! कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वोशरूम मध्ये सापडले नवजात अर्भक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव येथे खळबळ…! कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वोशरूम मध्ये सापडले नवजात अर्भक…

बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
.
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रुममध्ये एक नवजात स्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर घटना दि.१६ रोजी दुपारी दोन वाजता उघडीस आली.
याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे असिस्टंट मॅनेजर कृषा हनुमंत तावरे (रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात माळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगांव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रुममध्ये लहान नवजात स्री जातीचे अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बालकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेऊन बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यास उघड्यावर टाकून दिले म्हणून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान सदर मृत नवजात स्री जातीचे अर्भक अनैतिक संबंधातून तर जन्माला आले असावे की मुलगी नको म्हणून मृत अवस्थेत बाळ टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येईल असे तपासी अधिकारी उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!