आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपुर अमळनेरात भरला वैष्णवांचा मेळा..
अमळनेर : विक्की जाधव
आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपुर अमळनेरात वैष्णवांचा मेळा भरला आणि अवघी अमळनेर प्रति पंढरपूर नागरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली असुन अमळनेर प्रति पंढरपूर संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर – पंढरपूर येथे देखील वैष्णवांचा मेळा अन विठुरायाच्या नामघोषांनी अवघी दुमदुमतेय पंढरी असंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आज सर्वत्र महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या चारणावर माथा टेकन्या साठी आपापल्या परिसरात तर काही पंढरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. तर यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपास म्हणजे काय?
उपावृत्तीच पापांची सहवास गुणी सदा,उपवास म्हणावे त्या, शरीरा शोषणे न चि।
मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंद्य आचरण करू नये व गुणीजनांचा सहवास मिळावा या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात. फक्त शरीराचे पोषण अर्थात उपास, लंघन करेल तो उपवास नव्हे. या पार्श्वभूमीवर आपण जर उपासाचे पदार्थ खाऊन उपास करत असू, तर त्याला उपास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला नाही तर विविध विकारांपासून मनालाही उपास घडावा म्हणून सत्संग करावा असे शास्त्र सांगते.
उपास केल्याने होणारे फायदे
उपावृत्तस्य पापेभ्यो सहवासो गुणे हि य:।उपवास: स विज्ञेय: न शरीरस्य शोषणम् ।।
उपासाचे दिवशी शारीरिक लंघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात, तसेच मनाचे लंघन केले तर मनाचे विकार दूर होतात. विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपासाच्या दिवशी मन कामात, हरीकीर्तनात, भजनात रमवावे आणि अनन्यभावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे.
हे सर्व वाचून सुगरणींचा हिरमोड झाला असेल, परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना? ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. उपासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील, पण उपासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तना-मनाचा उपास अर्थात लंघन घडणे आवश्यक आहे!यंदाच्या एकादशीला तना-मनाला उपास घडवुया आणि विठ्ठल रखुमाईचे नाम घेऊया!