June 29, 2025 3:25 am

रस्त्याचे काम न झाल्यास वेळ आली कीं आम्हीच दाखवणार घरचा रस्ता. केशव नगरवासीय संतप्त महिलां

अपनी भाषा में पढ़े! Translate

रस्त्याचे काम न झाल्यास वेळ आली कीं आम्हीच दाखवणार घरचा रस्ता. केशव नगरवासीय संतप्त महिलां.

अमळनेर शहराला ब्लु प्रिंटचे स्वप्नं दाखवणाऱ्यांनी शहरातील खड्डे तर बघावेचं. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील विविध भागात भुयारी गटारीचे काममुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यात पावसाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल साचून यातायात करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी हे काम पावसाळ्यात बंद ठेवावे आणि खोदलेल्या रस्त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ह्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी अयोध्या नगर, रामवाडी, केशवनगरमधील महिलांनी केली राम मंदिरापासून तर थेट रामवाडी चा संपूर्ण परिसरातील हा रस्ता चिखलमय झालेला आहे. वारंवार अमळनेर नगर परिषदेला (प्रशासनाला) तक्रार करूनही ते लक्ष देण्यास तयार नाही.

शाळेतील विद्यार्थ्यांना याचं रस्त्यावरुन यें जा करावी लागते विद्यार्थीना चालणेही शक्य नाही अशी ह्या रोडची परिस्थिती आहे. विप्रोचे मोठमोठे वाहन याच रस्त्याने जातात. त्यामुळे अधिकच खड्डे पडतात आणि चिखलही भरपूर प्रमाणात होतो.

याकडे पालिकेने लक्ष न दिल्यास अखेर अयोध्या नगर, रामवाडी, केशवनगरमधील महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि रस्त्यावर वाहतूक करणारे डंफर परिसरातील महिलांनी अडून आंदोलन केले.

यावेळी लोकप्रातिनिधीना अरवाच्च भाषेत खडेबोल ह्या परिसरातील महिलांनी सुनावले असे व्हिडीओ शहातील बऱ्याच ग्रुप वर व्हयरल होत आहेत. 

 

यां ठिकाणी देखील आहेत रस्त्यात मोठे खड्डे. 

शहरातही मुख्य बाजारपेठेत असलेल्या राजस्थान स्वीटमार्ट जवळ भला मोठा खड्डा गेल्या दोन महिण्यापासून आहे. ह्या खड्याचा अंदाज न आल्याने येथे १५ तें २० नागरिक ह्या खड्ड्यात पडले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज. यां सह विविध चौका चौकात आणि कॉलनीतही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे त्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.

मागील काही दिवसात महाराणा प्रताप चौक आणि बहुगुणे हॉस्पिटल समोरील असणाऱ्या खड्ड्या संदर्भात अमळनेर मित्र परिवाराने यां खड्ड्यामुळे विविध प्रशासकीय ठिकाणी निवेदन दिले होते. यावेळी अमळनेर मित्र परिवारातील एका सदस्याने असे बोलून दाखवले कीं यांच्या कडून खड्याचे काम होत नाही विकास करण्याची काय अपेक्षा करणार.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!