June 29, 2025 7:51 am

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने आज मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने आज मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर
सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई, दि. ०८ : भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.

दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत (दिनांक ८ जुलै २०२४) अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे.

मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!