June 29, 2025 10:47 pm

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी.

अमळनेर : विक्की जाधव. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच होती. आता अखेर नाशिकचा निकाल हाती आला आहे. दरम्यान, गेल्या 26 जूनला या चार जागांसाठी मतदान पार पडले.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यांनी संदीप गुळवे यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नाशिक शिक्षक मतदारसंघांत पहिल्या फेरीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते. कोल्हे हे निवडणुकीत अपक्ष उभे होते. तर ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. मध्यंतरी गुळवे यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली होती. मात्र, त्यानंतर किशोर दराडे यांनी मोठी आघाडी घेतली. मात्र, विजयासाठी त्यांना 31 हजार 576 इतके मताधिक्य घेणे गरजेचे होते.

 

मजमोजणी दरम्यान, पहिल्या पसंतींच्या मतांमध्ये किशोर दराडे यांना विजयी आकडा गाठण्यासाठी जवळपास 5 हजार मताधिक्य कमी होते. दरम्यान, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत दराडे यांनी विजयाचा आकडा गाठला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर मतमोजणीवेळी जास्त मतपत्रिका आढळून आल्याने काही काळ मतमोजणी देखील थांबली होती. मतमोजणी प्रक्रियेत एकूण 5 मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या. यामध्ये निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली होती. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ मतमोजणी थांबली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मतमोजणीस सुरुवात करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!