June 29, 2025 12:04 pm

अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न,७८बाटल्यांचे रक्त संकलन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न,७८बाटल्यांचे रक्त संकलन

 

अमळनेर : विक्की जाधव

२३ जुन २०२४ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन ३६-बी अंतर्गत अमळनेर येथील सिंधी काँलनी मध्ये स्थित संत निरंकारी सत्संग भवन चोपड़ा रोड सिंधी कॉलोनी अमळनेर येथे सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस आगोदर संपूर्ण अमळनेर शहरात जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. रक्तदान शिबीराचे उद्घाटन धुळे झोन ३६ ब चे प्रमुख हिरालाल पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन तसेच फित कापुन करण्यात आले. तसेच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण , नेत्र तपासणी इ. कार्यात योगदान देत आहे.

अमळनेर शाखेचे प्रमुख श्रीचंद निरंकारी यांनी झोनल इंचार्ज यांचा स्वागत व सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. तसेच यावेळी एकुण ७८ रक्तयुनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढी चे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते. या विशाल भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार ,भोजन व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणासाठी अमळनेर च्या संत निरंकारी मिशनचे सर्व साधक सेवादल अधिकारी व अमळनेर शाखेचे प्रमुख श्रीचंद निरंकारी जी यांच्यासह सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी सकाळपासूनच आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!