शहरातील सेतू कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून जादा दराने आकारणी, दौंड शिवसेनेने केला पर्दाफाश व गंभीर आरोप .
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड : शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ घेता यावा त्या साठी जलद सेवा देण्यासाठी कमी पैशात महाराष्ट्र शासनाने सेतू कार्यालय सुरू केले. मात्र सेतू कार्यालयाकडूनच नागरिकांची आर्थिक लूटमार होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सेतू केंद्राकडून शासनाच्या विविध विभागामार्फत नागरिकांना ई-प्रशासकीय लाभ नाममात्र शुल्क भरून सेवा दिल्या जातात यासाठी राज्य शासनाने सर्व सेतू केंद्राला ठराविक दर ठरवून दिले आहे.मात्र ठराविक रकमेव्यतिरिक्त जादा रक्कम सेतू केंद्राकडून घेतली जात आहे.अनेक वेळा कार्यालयात शिक्षित व्यक्ति याबद्दल आवाज उठवतो मात्र त्याला तेथे शांत केले जाते.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शालेय कामासाठी विविध दाखल्यासाठी सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांची लांबलचक रांग लागलेली आहे मात्र सेतू केंद्राकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. दौंड तहसिलदार कार्यालयातील सेतू केंद्रावर असाच भोंगळ कारभार चाललेला असल्याचा खळबळजनक आरोप दौंड शिवसेना शहरप्रमुख श्रीनाथ ननवरे यांनी केला, सेतू केंद्रात दाखल्यांसाठीचे दरपत्रक लावून ग्राहकांची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन दौंड तहसिलदार यांना शिवसेनेचे शहरप्रमुख श्रीनाथ ननवरे व शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक अर्जून मंडवाले यांनी दिले आहे.व लवकरात लवकर यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली.