June 29, 2025 11:07 am

सख्या काकाने पुतण्याच्या छातीवर चाकूने केला वार

अपनी भाषा में पढ़े! Translate

काका घरात मद्य पिण्यासाठी लोकांना घेऊन बसला असता त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून काकाने पुतण्याच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रावेर येथे रात्री घडली. याबाबत रावेर पोलिसांत नोंद करण्यात आली असून काकास पोलिसांनी अटक केली आहे.

अमळनेर : विक्की जाधव.

सविस्तर वृत्त असे कि, सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन हा काही लोकांबरोबर काल रोजी रात्री १० वाजेचे सुमारास घरात घेऊन मद्य पित होता. या वेळेस त्यांचा पुतण्या रवींद्र मुरलीधर महाजन याने संताप व्यक्त केल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला. या वेळी काका सुभाष महाजन याने पुतण्या रवींद्र महाजन (वय ४०) याच्या छातीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात रवींद्र हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सुरेखा दिलीप महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ करत आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या रवींद्र याच्यावर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्यास जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!