June 29, 2025 5:57 am

गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन गोशाळा मंत्री, अनिल पाटील. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन गोशाळा मंत्री, अनिल पाटील. 

अमळनेर : विक्की जाधव. 

कोविड काळात अन्नछत्र, दुष्काळात चारा छावणी, टँकर द्वारा पाणीपुरवठा व 2015 पासून सुमारे 400 गोमातांचे संरक्षण ,संवर्धन करणे याबरोबरच गेल्या सहा वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन बाबुलाल शहा गोशाळा, अमळनेर ही अभिनंदनास पात्र आहे .हर्षा बेन सावला यांचे नेतृत्वाखाली जनकल्याण ग्रुप ,मुंबई हे दरवर्षी हजार गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साठी आर्थिक मदत करतात त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे उद्गार दादासाहेब अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी गोशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना काढले .व्यासपीठावर जनकल्याण ग्रुप मुंबईच्या जागृती कोठारी, मोना शहा, हर्षा बेन सेठ, रश्मी शहा, सरला मामी पुरिया, निशा गोरडिया, रुहल घ थलिया ,सारिका मोदी, रघुवीर स्वीट दिलीप भाई, एम टी सी ग्रुप के संजय मेहता व भानुबेन बाबूलाल शहा, गोशाळेचे सचिव ,चेतन शहा उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .अशोक पवार यांनी केले. सूत्रसंचालन दयाराम पाटील सर तर स्वागत गीत मेघा पाटील व विद्यार्थिनींनी म्हटले.

भानू बेन बाबूलाल शहा, गोशाळा, अमळनेर व युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनकल्याण ग्रुप मुंबईच्या वतीने मोनाबेन शहा यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भाषण झाले .मुंगसे , बहादरवाडी, हिंगोने बुद्रुक, नंदगाव, लाडगाव, शिरसाळे, ढेकू सिम, हिंगोने खू प्र , दहिवद खुर्द ,वाक टूकी ,खोकर पाठ ,येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना तर समता युवक कल्याण केंद्र प्राथमिक शाळा, साने गुरुजी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय प ष्टाने , पिंपळे रोड भिल्ल वस्ती, ताडेपुरा, शनी पेठ, गोशाळा परिसर, जैन मंदिर कर्मचाऱ्यांची पाल्य, येथील गरीब व गरजू एका विद्यार्थ्यास सातशे रुपये पर्यंतचे शैक्षणिक साहित्य एक हजार चार विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षक, पालकांची भोजनाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली होती. चेतन राजपूत, विक्की जाधव, अजय भामरे, बापूराव ठाकरे, उमाकांत ठाकूर, सोपान भवरे, उमेश धनराळे. आदी पत्रकार उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास माजी अप्पर जिल्हाधिकारी एच टी माळी,वीरेंद्र भाई शहा, प्रकाश पारेख ,प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगरसेवक श्याम पाटील, चेतन सोनार ,प्रफुल्ल सिंघवी, बिपिन कोठारी, गिरीश भाई शहा, डॉ शहा, आदी मान्यवर उपस्थित होते ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील सर,योगेश पाटीलसर, परदेशी सर ,डी ए पाटील सर ,विक्रम पाटील ,वाणी सर , भारती गा ला, मालती पाटील, अर्चना गिरीश वर्मा व त्यांचा गार्डन ग्रुप, रोहित सोनार, उमेश सोनार, अजय शहा, अथर्व डेरे, मिलिंद डेरे प्रकाश डेरे, रमेश धनगर ,मुकेश महाजन, किसन महाराज ,सलीम भाई तडवी, महेश राजपूत, मनीष राजपूत, भैय्या पवार, रमेश पावरा, रतिलाल पावरा, लालू पावरा आदींनी कठोर परिशन घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!