सुनंदा पार्क भालेराव नागरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसला.
अमळनेर : विक्की जाधव.
१८ जून च्या मध्यरात्री 2 वाजता सुनंदा पार्क,भालेराव नगरात घरात संपूर्ण कुटुंब झोपलेले असतांना चोरांनी अंधाराचा फायदा घेत घरात शिरण्याचा प्रयत्न केला खरा पण, कडी उघडण्याच्या आत घरातील झोपलेले जागी झाले त्या घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी शेजारी असलेल्या चंद्रकांत कंखरे यांना फोन केला अन लवकर बाहेर या,, आमच्या घरात चोरी होत आहे. या मदतीच्या आशेने कंखरे यांना फोन केला खरां पण कंखरे यांनी घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा दरवाजा बाहेरून बंद केला होता त्यांनी तात्काळ शेजारी असलेल्या लोकांना फोन केले सगळे कॉलनीतल्या लोकांना जाग आली आणि सगळे बाहेर पडले त्या वेळेचे गांभीर्य घेत चोर पसार झाले.
प्रत्येक्षदर्शी चंद्रकांत कंखरे सांगतात की.
सदर झालेल्या घटनेची पोलिसात माहिती दिली असता तात्काळ पोलीस आले आजूबाजूला शोध घेऊ लागले काही वेळ गेल्यावर आमच्या समोरूनच तीन तरुण संशयीत रित्या रात्री २:३० वाजता मोटारसायकल वर अगदी सहजपणे निघाले जणू काही झालेच नाही त्यांचा वाहन नंबर पोलिसात दिल्यावर त्यांना संशयित म्हणून पकडले आहे. आणि चोरांची ही एक साखळी असल्याचे समजते अमळनेर मध्ये होणाऱ्या घरफोडीत हेच तें सूत्रधार असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.