June 29, 2025 5:06 am

वाळू चोराने मारला एकच्या डोक्यात फावडा पोलिसात गुन्हा दाखल. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

वाळू चोराने मारला एकच्या डोक्यात फावडा पोलिसात गुन्हा दाखल. 

अमळनेर : विक्की जाधव..

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रमोद चव्हाण हा श्रावण मोतीलाल पारधी यांच्यासोबत ४ रोजी कन्हेरे येथे बोरी नदीतून जात असताना सुरेश मुकुंदा गोलाईत हा नदीतून पॅजो रिक्षामध्ये वाळू भरत होता. त्याला प्रमोद चव्हाण याने वाळू भरू नको म्हणून सांगितले असता सुरेश याला राग आला आणि त्यांनी नदी तुझ्या बापाची आहे का असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. आणि त्याचा भाऊ सागर गोलाईत याला फोन लावून बोलावून घेतले.

सागर देखील आल्याआल्या शिवीगाळ करू लागला. तेव्हढ्यात सुरेश याने पावडीच्या साह्याने प्रमोद च्या डोक्यात मारल्याने प्रमोद जखमी झाला त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याने त्याला उपचारासाठी अमळनेर येथील ग्रामिण रुग्णलयात दाखल करण्यात आले. या संदर्भात उशिरा फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा भावाविरुद्ध ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!