June 29, 2025 5:01 am

स्वामी दर्शन महानुभाव महिला मंडळाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वामी दर्शन महानुभाव महिला मंडळाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला

रजत डेकाटे – प्रतिनिधी नागपूर

स्वामी दर्शन महानुभाव महिला मंडळाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस आदर्श विद्यामंदिर, शारदा चौक, जुना सुभेदार ले आउट, नागपूर येथे साजरा केला.
महिलांनी विविध कार्यक्रम नृत्य , गीत गायन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, रॅम्प वॉक, इत्यादी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तने सहभाग घेतला.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. डॉ. सौ विद्याताई वासनिक बी. ए.एम.एस., एम. डी.,पी.एच.डी., असोसिएट प्रोफेसर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,नागपूर लाभल्या . स्त्रियांच्या आरोग्या विषयी त्यांनी सखोल माहिती दिली. हल्ली महिलांमध्ये वाढत असलेल्या थायरॉईड, पी.सी.ओ.डी, कॅन्सर, वाढते वजन इत्यादी रोगांवर उपचार व काळजी कशी घेता येईल याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. सौ अनिताताई जवदंड एम.ए.,पी.एच.डी.माजी मुख्याध्यापिका आदर्श विद्यामंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहासातील महिलांचे आदर्श व त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यांचा उल्लेख आपल्या कवितेतून त्यांनी सादर केला. समाज घडविण्यात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्र महिलांसाठी खुले आहे असे सांगत त्यांनी सुरेख मार्गदर्शन केले.
विशेष अतिथी म्हणून मा. ॲड. सौ नीलाक्षीताई गौरे उपस्थित होत्या. वकील असल्यामुळे महिलांसाठी असलेल्या कायद्या विषयी माहिती दिली. कायद्याची माहिती असेल तर स्त्रियांना न घाबरता स्वतःसाठी उभे राहता येईल अशा सर्व कायद्यांची माहिती देत त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ प्रिया शेंडे यांनी महिला सशक्तिकरण याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती मा. डॉ. सौ वनिता मेश्राम यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिलांचे आर्थिक अध्ययन याविषयी पी.एच.डी. प्राप्त केली असून त्यांचा सत्कार महिला मंडळा तर्फे करण्यात आला. बाबासाहेब होते म्हणून स्त्रियांना संविधाना अंतर्गत बरेच अधिकार प्राप्त झाले. त्यांचे उपकार विसरता येत नाही. असे सांगत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मा. गिरीश चौरे उपायुक्त जी.एस.टी. नागपूर यांनी एम.एस.डब्ल्यू.फाउंडेशन संस्थेबद्दल माहिती दिली. संस्थेचे उद्दिष्ट सर्वांसमक्ष मांडले. ही संस्था महानुभाव पंथीय गरजू विद्यार्थी मुले- मुली यांच्या विकासाकरिता सहकार्य करेल अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमांमध्ये उपस्थित महिलांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. सौ मंदाताई कोवले यांनी विदेशातील स्त्रिया व भारतीय स्त्रिया यांची तुलना करून आपली संस्कृती उत्तम आहे हे ठामपणे सांगितले. तसेच सौ. रजनीताई गजभिये,सौ. शांताताई बोरकर, सौ.तारा ताई दाते यांनी स्त्रियांना समाजात वावरताना येणाऱ्या समस्या व स्त्रियांनी कसे सक्षम असायला पाहिजे तसेच श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षांपूर्वी स्त्रियांना समानतेचा अधिकार व अध्यात्मिक हक्क मिळवून दिले याबाबत माहिती दिली. सौ संध्या ताई चंद्रिकापुरे, सौ. कोमल बोरकर, सौ.प्रमिलाताई अडकणे, सौ.यशोधरा ताई निमगडे, सौ. सारिका ताई गजभिये, सौ. निशाताई नागदिवे इत्यादी महिलांनी सुंदर कविता सादर करत आद्य कवियत्री महदंबा यांचा उल्लेख करून अप्रतिम कवितेचे सादरीकरण केले. लहान मुलींनी सुंदर नृत्य प्रस्तुतीकरण केले. त्यामध्ये कुमारी गार्गी रंगारी, कुमारी दर्शना खोब्रागडे, कुमारी सिमरन शेंडे, कुमारी देवश्री गजभिये, यांनी सहभाग घेतला. छायाताई कलासुआ यांनी रमाईच्या जीवनावर आधारित सुंदर गीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी नृत्य देखील सादर केले. सौ.अर्चनाताई बारमाटे यांनी महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी ही कला जपत अत्यंत सुंदर अभिव्यक्तीसह आपली अप्रतिम कला सादर केली. महिलांनी भारतातील विविध संस्कृतीचे महत्त्व सांगत विविध वेशभूषेमध्ये रॅम वॉक व अभिनय सादर केले. महिलांसाठी खेळांचे आयोजन करून आयोजकांनी कार्यक्रमाला एक वेगळी रंगत दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.स्नेहलताई गजबे यांनी केले तसेच संचालन सौ.केतकीताई खोब्रागडे यांनी केले. आभार सौ.रजनीताई गजभिये यांनी व्यक्त केले. सर्व आयोजक मंडळ सौ छायाताई कलासूआ,सौ. शांताताई बोरकर, सौ. स्नेहलताई गजभिये, सौ.अर्चनाताई बारमाटे, सौलक्ष्मी ताई मेश्राम, सौ. भारतीताई शेंडे, सौ.रजनीताई गजभिये, सौ.प्रमिला अडकणे, सौ.यशोधरा निमगडे, सौ.शुभांगी ताई खोब्रागडे इत्यादी महिलांनी उत्तम नियोजन केले व सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!