June 30, 2025 2:22 pm

पिळोदा येथील उत्तमराव निकुंभ २०२३-२०२४ आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिळोदा येथील उत्तमराव निकुंभ २०२३-२०२४ आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग जळगाव यांच्या मार्फत पुरस्कार जाहीर

अमळनेर:तालुक्यातील पिळोदा येथील प्रगतिशील शेतकरी श्री. उत्तमराव आत्माराम निकुंभ यांना 2023 -2024 चा आदर्श शेतकरी पुरस्कार जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग जळगाव यांच्या सेस योजनेअंतर्गत नुकताच जाहीर करण्यात आला,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते दि. ९ रोजी पंचायत समितीच्या सानेगुरुजी हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. उत्तमराव निकुंभ यांनी शेतीत अनेक नवीन प्रयोग यशस्वीरित्या राबवून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार सोहळ्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुशांत पाटील , कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी सह अनेक शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारामुळे श्री. उत्तमराव निकुंभ यांना प्रोत्साहन मिळेलच, शिवाय इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!