करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- केत्तूरचे माजी सरपंच अॅड.अजित विघ्ने यांची करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. अॅड. विघ्ने हे उत्तम वक्ते असून त्यांचा जनसमान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क आहे. विघ्ने हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. त्यांची लिखाणाची शैली उत्तम आहे. वेळ देऊन व झोकून देवून काम करण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळेच पक्षांने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांचे विश्वासू व क्रियाशिल कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.