दलालांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील महिलांचे हाल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

दलालांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील महिलांचे हाल..

राजकीय श्रेय घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलून दिलेत खोटे आश्वासने..

अमळनेर : विक्की जाधव..

बांधकाम मजुरांसाठी शासनाची संसारोपयोगी भांडे देण्यासाठी योजना राबवली जात आहे त्यासाठी कामगाराकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र आवश्यक आहे. यासाठी महिलांना अंमळनेर येथे काही राजकारण्याने दिशाभूल करून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बोलावून टोकनही दिले पण भांडे देण्यास टाळा टाळ करू लागल्याने महिलांना सांगण्यात आले की भांडे येत आहेत भांडी दुपारपर्यंत आली नाहीत ग्रामीण भागातील महिला रात्रीपासून तर दुपारपर्यंत ह्या महिला भर उन्हात उभ्या होत्या. यासाठी भडगाव येथील फयाज शेख याना कंत्राट देण्यात आला आहे. कंत्राट दाराने सर्व लाभार्थ्यांना काही दिवसांपूर्वी भडगाव येथे बोलावले होते. त्यावेळी अवकाळी गारपिट झाली होती. त्यात मजुरांचे हाल झाले. नंतर मजुरांना शनिवारी अमळनेर येथे बोलावण्यात आले. शनिवारी कंत्राट दाराने मंत्री अनिल पाटील यांच्या बंगल्यावर वाटपसाठी
यंत्रणा मागितली. काही लोकांना टोकन दिले आणि नंतर वाटप बंद केली. त्यावेळी महिलांनी संताप व्यक्त केला.
तेथून महिलांना मंगळवारी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मजुरांना भांडे वाटप केले जातील असे सांगण्यात आले. मात्र रात्री पासून आलेल्या महिलांना आपणास खोटे आश्वासन दिले जात आहे हे समजल्यावर महिलांनी आरडाओरड सुरू केली. बाजार समितीत ठेकेदार येत नाही म्हणून काही महिलानी आपला मोर्चा तहसील कार्यालया कडे वळवलां
तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर ही ह्या महिलांनी आंदोलन केले. तर तहसीलदार यांनी मध्यस्थी करून मोर्चाकरांना शांत केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!