June 29, 2025 7:26 pm

अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चार कोटी १३ लाख ५२ हजार रुपयांची वसुली..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र
न्यायालयात चार कोटी १३ लाख ५२ हजार रुपयांची वसुली..

अमळनेर : विक्की जाधव..

अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र
न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १५९ प्रकरणे निकाली काढण्यात आले. सुमारे चार कोटी १३ लाख ५२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दि. ३ मार्च रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रलंबित खटल्याचे १ हजार ३२७ प्रकरणे लोक
अदालतमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातून ११३ खटले न्यायालयाने सोडविले असून त्यातून ३ कोटी ७८ लाख ६९ हजार ४६८ रुपयांची वसुली करण्यात आली. तर ३ हजार २२ वादपूर्व खटले लोक न्यायालयात दाखल
करण्यात आले होते. त्यापैकी ४६ खटले निकाली काढण्यात आले असून त्यातून ३४ लाख ८२ हजार ५४४ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या लोक अदालतमध्ये वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ऍड. विलास डब्लु. वाणी, अध्यक्ष ऍड वाय. पी. पाटील, उपाध्यक्ष ऍड नंदलाल व्ही. सूर्यवंशी, सचिव ऍड. जितेंद्र पी. साळी व सरकारी वकील किशोर बागुल, शशिकांत पाटील, राजेन्द्र चौधरी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!