अमळनेर नगरपरिषद येथे उच्च अधिकार्याने कर्मचाऱ्यास केलेल्या शिवेगाळा मुळे अमळनेर परिषदेचे कामकाज ठप्प..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर नगरपरिषद येथे उच्च अधिकार्याने कर्मचाऱ्यास केलेल्या शिवेगाळा मुळे अमळनेर परिषदेचे कामकाज ठप्प याबाबत अधिक माहिती अशी की
संदीप देवाजी गायकवाड कर व प्रशासकीय सेवा अधिकारी गेल्या पाच वर्षा- पासून अमळनेर नगरपरिषदेत राजकिय वरदहस्ताने ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली आहे की जेष्ठ कर्मचाऱ्यांसह
(कनिष्ठ) कर्मचाऱ्यांना अतिशय खालच्या भाषेत
शिवीगाळ भाषा वापरून कर्मचाऱ्यांना अपमानित करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षितता वाटत असून कर्मचारी वर्गांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
याचा परिणाम म्हणून आज दि. 23/02/2024 पासून सर्व कर्मच्यांनी काम बंद आदोलन पुकारले असुन संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
या संदर्भातील निवेदन अमळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.