November 21, 2024 3:52 pm

वैराग्याचा एक मूर्तिमंत आविष्कार गाडगेबाबा या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला – एकनाथराव बोरसे

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूरला संत गाडगेबाबा जयंती साजरी

शिरपूर : परिट (धोबी) सेवा मंडळ शिरपूर यांचा वतीने श्री. संत गाडगेबाबा यांची दि. २३ फेब्रुवारी रोजी १४८ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील श्रीनगर काॅलनी मध्ये संत गाडगे बाबा उद्यान मधील संत गाडगे बाबा यांचा पुतळ्यास अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, किसान विद्या प्रसारक अध्यक्ष तुषार रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, किसान विद्या प्रसारक कोषाध्यक्षा श्रीमती आशाताई रंधे यांचा हस्ते पुजन व मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे होते.

 

महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई रंधे व महिला मंडळ अभिवादन करतांना..

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, किसान विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष तुषार रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, किसान विद्या प्रसारक कोषाध्यक्षा श्रीमती आशाताई रंधे, महिला मंडळ प्रदेशाध्यक्ष सौ. सिमा रंधे, माजी नगर सेवक रोहित रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ ज्येष्ठ मार्गदर्शक तथा उद्योजक अशोक बेडीस्कर, परिट (धोबी) सेवा मंडळ तंटामुक्ती समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सदाशिव ठाकरे, परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, शहराध्यक्ष नरेश पवार, परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बोरसे उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे. वैराग्याचा एक मूर्तिमंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला.

 

‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजन-कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोक शिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाज प्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४८ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन परिट (धोबी) सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी केले. परिट (धोबी) सेवा मंडळ युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, योगेश सैंदाणे, परिट (धोबी) सेवा मंडळ लॉन्डी धारक जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ माजी तालुकाध्यक्ष उमेश खैरनार, परिट (धोबी) सेवा मंडळ माजी शहराध्यक्ष भगवान वाघ, परिट (धोबी) सेवा मंडळ माजी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, रतिलाल वाल्हे, परिट (धोबी) सेवा मंडळ युवक शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, वसंत सुर्यवंशी, राजेंद्र येशी, मयुर येशी, शालीग्राम येशी प्रकाश बोरसे, अनिल बोरसे, निळकंठ बोरसे, मधुकर बोरसे, आत्माराम भिलाणे, योगेश धोबी, सुनिल सुर्यवंशी, दिलीप चव्हाण, गणेश बोरसे, भिका भदाणे, लक्ष्मण बोरसे, ईश्वर येशी, प्रशांत पवार, नरेंद्र कापडे, गोकुळ चित्ते, मोहन येशी प्रविण जाधव, जितेंद्र मोरे, बबन येशी, दिलीप येशी, जगदिश जाधव, रतीलाल बोरसे, गोविंद बोरसे, संभाजी बोरसे, हरीओम भिलाणे, जितेंद्र निकम यांचासह शिरपूर शहर व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!