June 29, 2025 3:10 am

अमळनेर संत गाडगेबाबा स्मारक येथे नगरपरिषद कर्मचारी यांच्याकडून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्म जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण परिसर स्वच्छ करून बाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून केले अभिवादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत गाडगेबाबा स्मारक येथे नगरपरिषद कर्मचारी यांच्याकडून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्म जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण परिसर स्वच्छ करून बाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून केले अभिवादन..

अमळनेर : विक्की जाधव

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्म जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण परिसर स्वच्छ करून बाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून केले अभिवादन. यावेळी प्रभाग क्रमांक 12 मधील मुकादम श्याम करंदीकर कर्मचारी विकास आनंदा मोरे.अनिकेत दिलीप सोनवणे, विजय वसंत संदानशीव, किरण धोंडू संदानशिव, सिद्धार्थ संजय बिराडे, अजय रमेश सपकाळे, नितीन किसन धाप, शकील लालबेग, विजय किशोर गोयर, एस आय संतोष बिराडे साहेब, एस आय हैबतराव पाटील साहेब आणि अमळनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव युवा परीट मंडळ अमळनेर, परदेशीं धोबी समाज, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील ग्रामीण  भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगे महाराज यांनी ग्रामीण भागात ‘स्वच्छतेची चळवळ’ उभी केली होती. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ
करण्याचे काम हाती घ्यायचे. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक विद्यापीठ होते.
संत गाडगे बाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म जन माणसाला शिकवला. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शिक्षणाचे महत्त्व ओळखून ठिक ठिकाणी शाळा उभारल्या, अन्न छत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. संत गाडगेबाबा यांचे अमूल्य विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. संत गाडगेबाबा यांच्या
जयंतीनिमित्त अभिवादन..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!