June 29, 2025 2:08 pm

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. 

प्रतिनिधी पिंपळे

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे संपन्न झाला .नमूद मेळाव्याचे उदघाटन मदत व पुनर्वसन मंत्री मा. नामदार श्री अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नमूद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री दत्ताभाऊ काकडे ,प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई हे होते,तर माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी ,राज्य कोर कमिटीची सदस्य श्री.आबासाहेब सोनवणे, राज्य कमिटीचे प्रमुख श्री जे डी टेमगिरे साहेब, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री राजमल भागवत ,उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सौ सुषमाताई देसले ,जिल्हाध्यक्ष श्री बाळूभाऊ धुमाळ, श्री श्रीकांत पाटील जिल्हा समन्वयक ,श्री सुरेशतात्या पाटील कार्याध्यक्ष एनसीपी अमळनेर,श्री नितीन पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्री हिरालाल पाटील संचालक बाजार समिती यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच यांचे अधिकार अत्यंत मौलिक व महत्त्वाचे आहेत ,व खऱ्या अर्थाने ग्रामविकास चक्र सरपंच यांचेच हातात असते,असे नमूद केले.तसेच सरपंच परिषद च्या माध्यमातून सर्व सरपंच उपसरपंच तसेच महिला सदस्यांना अधिक सक्षम करून त्याना योग्य ती मदत पुरविण्यात येत असते .नमूद सरपंच परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले यांचे मार्गदर्शनात अमळनेर तालुका अध्यक्ष श्री महेंद्र बोरसे, जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत पाटील, व सौ कल्याणी पाटील,महिला तालुका अध्यक्ष सौ शितल पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री महेंद्र पाटील यांनी केले.नमूदप्रसंगी नवीन पदाधिकारी याना नियुक्ती पत्र ही देण्यात आले . नमूद मेळाव्यास सरपंच उपसरपंच सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!