कामठी तालुक्यातील गादा येथे पंचकृष्ण पुजन महोत्सव संपन्न
रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
नागपूर//कामठी
कामठी तालुक्यातील गादा येथे श्री.द्वारकाधीश महानुभाव मंदिर सेवा समिती गादाच्या माध्यमातून भव्य पंचकृष्ण पुजन महोत्सव साजरा करण्यात आला.द्वारकाधीश महानुभाव सेवा समितीच्या वतीने पहिल्या सत्रात चक्रधर स्वामी मिरवणूक काढण्यात आली. राजेश काकडे यांच्या पुढाकाराने पंचकृष्ण पुजन महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.
द्वारकाधीश महानुभाव सेवा समितीच्या वतीने व मॉं सर्वमयी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर व जायन्ट्स मल्टीस्टेट क्रेडिट -को ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर व राजेश काकडे यांच्या संयुक्त पुढाकाराने गादा येथील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी द्वारकाधीश महानुभाव सेवा समिती गादाच्या तर्फे प.पु.म प्रकाश मुनी मराठे ऊर्फ प्राध्यापक बोदडे सर यांचे किर्तनाचे सुध्दा आयोजन केले होते गावातील नागरिकांनी कीर्तनाला मोठी हजेरी लावली होती. किर्तनात बैलवाडा येथील भजन मंडाळाचा मोठा वाटा होता.
यावेळी धर्मसभेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.
संत महात्मे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून धर्मसभेला सुरुवात करण्यात आली.
धर्मसभेत प.पु.म.श्री.देपेराजबाबा पंजाबी,प.पु.म.प श्री. पाटणकर बाबा झुल्लर,प.पु.प.इ.श्री.लेखराज बाबा येळमकर (वैरागी बाबा), प.पु. म. केशीराज बाबा यांची यावेळी धर्मसभेत उपस्थिती होती.
व्यासपीठावर सर्व संत महात्मे यांनी महानुभाव पंथाच्या विचारावर प्रकाश टाकला.
द्वारकाधीश महानुभाव मंदिर सेवा समितीच्या कडून पंचकृष्ण पुजन महोत्सवाला सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रपाल वैद्य, ॲड तुप्ती बोरकुटे व गादा येथील द्वारकाधीश महानुभाव सेवा समितीला सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचा राजेश काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.इतकेच नव्हे तर गावकऱ्यांनी सुध्दा राजेश काकडे व त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांचा सुध्दा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र खेडीकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश काकडे यांनी केले तर ज्योती काकडे यांनी आभार मानले.
यावेळी रमेश वानखेडे, राजु शहाने, विनोद वारकर,सोपान वानखेडे, संजय अंबाळकर, वसंता काकडे, प्रथमेश काकडे, प्रविण डंभारे, विजय इजाळ,आषिश चौधरी, मंगेश अतकरे, मनस्वी काकडे, मालती फटिंग, डॉ. निकिता काकडे, बेबी ठाकरे,प्रिती डंभारे गावातील नागरिक उपस्थित होते.