बिल्ट कंपनीतील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या उपोषणाला 15दिवस होऊनही निर्णय होत नसलेमुळे भिगवण येथे रास्ता रोको….
(निलेश गायकवाड )
बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत दिनांक 24 जानेवारी 2024 रोजीपासून तहसील कार्यालयाबाहेर पाच कामगार आमरण उपोषणाला बसलेले असून पंधरा दिवस होऊनही कायमचा निर्णय होत नाहीं सध्या ही त्यांचे आमरण उपोषण चालू आहे .
सदर कालावधीमध्ये माथाडी बोर्डाने दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे सदर प्रश्ननाबाबत मीटिंग आयोजित केलेली होती त्यामध्ये 30दिवसाचा कालावधी मागितला आहे सदर उपोषण करते कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे असे असतानाही 15दिवस होऊनही बिल्ट कंपनी, माथाडी बोर्ड यांनी कोणताही म्हणावे तेवढी दखल घेतलेली नाही व त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार यांचेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.. त्यामुळें शासनाने गोरगरीब कामगार यांना तात्काळ नियुक्ती पत्र देणेत यावे या मागणीसाठी दि 8फेबुवlरी सकाळी 10वाजता भिगवण येथिल हॉटेल सागर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सदर वेळी भिगवण ग्रामपंचायतचे माजी सरपंच पराग जाधव, माजी सरपंच तानाजी वायसे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बंडगर.महासंघाचे विभागीय संघटक राजकुमार मस्कर , लोकशासन आंदोलनाचे पूणे जिल्हा प्रमुख श्री चंद्रकांत भोई, शरद चीतारे, छगन वाळके, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे, सुभाष फलफले, नामदेवराव जगताप, सुनिल काळे, गुररप्पा पवार,प्रशांत गायकवाड, अनेक कामगार उपस्थित होते.
सदर कामगारांना लेखी नियुक्तीपत्र माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी आंदोलकांनी ग्वाही दिलेली आहे..
सदर कामगार गेली पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास संपूर्णतः बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी ,माथाडी बोर्ड पुणे ,कामगार आयुक्त कार्यालय पुणे व प्रशासन संपूर्णतः जबाबदार राहील तसेच सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास ही वरील प्रशासन जबाबदार राहिल असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप यांनी प्रशासनाला इशारा देणेत आला.
सदर निवेदन मंडल अधिकारी लोणी देवकर यांनी स्विकारले सदर वेळीं भिगवण पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.