बोराडी – नांदर्डे रस्त्यावरील बोराडी घाटात शिरपूर कडून येणारी एसटी बस व बोराडी कडून जाणारे महिंद्रा पिकप वाहन यांचा समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून ह्यात तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
शिरपूर आगाराची एम एच 20 बी एल ०६९९ क्रमांकाची बस शिरपूर होऊन पानसेमल कडे जाण्यासाठी शिरपूर डेपोतून निघाली होती साडेसात वाजेचा सुमारात बोराडी घाटात बस व बोराडी कडून दूध घेऊन जाणारे महिंद्रा पिकप वाहन क्रमांक एम एच १८ AA ६४४१ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली धडक एवढी जोरात होते की तिचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला असून पिकप वाहनाचा चुरा झाला आहे. ह्यात प्रवाशी अनेक प्रवासी जखमी झाले असून यात बसमधील ड्रायव्हर वाडी येथील शरद सैंदाणे कंडक्टर के.बी.कोळी व पिकप गाडी मधील ड्रायव्हर किन्नर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. यांना पुढील उपचारासाठी वाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच जखमींना तातडीने वाडी येथील व बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात बसचे ड्रायव्हर शरद सैंदाणे, कंडक्टर के.बी.कोळी व पिकप यांचा ड्रायव्हर चौधरी पूर्ण नाव माहित नाही व त्यातील किन्नर याचे नाव माहित नाही.बस मधील अनेक प्रवाशांचे जखमी असून त्यांचे नाव अद्याप माहित नाही बसमधील प्रवासांच्या म्हणण्यानुसार पिकप वाहन रस्त्यावर आट्यापाट्या खेळत एसटीला जोरदार धडक दिली असल्याचं एसटी मधील प्रवाशांनी सांगितले आहे. एसटी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडताना थोडक्यात वाचली यामुळे अनेक प्रवासांचे जीव वाचले आहे तर धक्कादायक बाब म्हणजे पिकप गाडी च्या भत्त्याला लागलेला पाईप बसमधील ड्रायव्हरच्या छताच्या आरपार गेला पण त्यातील ड्रायव्हर खाली पडल्याने बाल बाल वाचून गेले आहेत.
घाटी मधील अपघाताची माहिती मिळताच तातडीने बोराडीतील मोठ्या संख्येने युवक घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले या पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, शशांक रंधे, सागर ठाकूर, श्रीकांत बोरसे, निलेश महाजन, मयूर पाटील, दादू पाटील, प्रवीण पाटील, विजय गोपाळ, डॉ .गणेश पाटील डॉ. नितीन जाधव, रवींद्र शिंदे, बल्लू पाटील, अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ, सुरेश ठाकूर,अमोल महाजन,कैलास गोपाळ,श्रीराम पवार, चंद्रकांत बडगुजर,यांच्यासह अनेक युवक युवकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने खाजगी वाहनातून वाडी शिरपूर येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळतात एसटी डेपोचे मॅनेजर यांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमींची विचारपूस केली.