भिगवण ट्रॉमा केअर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपकरणे बसून तात्काळ चालु करण्यची मागणी….
अखिल भारतीय मराठा महासंघाने इंदापूर चे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचेकडे केली..
भिगवण परिसरातील सर्व नागरिकांना वरदाई ठरलेली ट्रॉमा केअर सेंटरची बिल्डिंग गेल्या अनेक वर्षापासून तयार झालेली आहे. सदर ट्रॉमा केअर सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टर ,आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक मशनरी व लागणारी साधन सामग्री नसल्यामुळे सदर ट्रॉमा केअर सेंटर बांधून पूर्ण होऊन चार-पाच वर्षे झाले असतानाही पूर्ण शमतेने चालू झालेले नव्हते व नाही त्यामुळे भिगवण परिसरातील नागरिकांना सदर शासकीय दवाखान्याचा लाभ घेता येत नाही त्यामुळे गेले अनेक वर्षापासून नागरिकांची गैरसोय होत आहे व त्यामुळे नागरिकांमध्ये उदासीनतेची भावना निर्माण होऊ लागली होती त्यामुळे सदर ट्रॉमा केअर सेंटरला आवश्यक ती यंत्रणा पुरून ते तात्काळ चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. असे असताना सदर ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ चालू होऊन गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे आवश्यक असल्यामुळे त्याची शासन पातळीवर पूर्तता करावी ही संघटनेची मागणी आहे. याबाबत आपण सकारात्मक विचार करून तात्काळ सदरची ट्रामा केअर सेंटर योग्य त्या सोयी सुविधांसह पूर्ण क्षमतेने चालू करणे कामी योग्य ती कार्यवाही करावी सदर निवेदन भिगवण येथे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना अखिल भारतीय मराठा महासंघ पूणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप, भिगवण शाखा अध्यक्ष छगन वाळके. खजिनदार अशोक साळुंके. युवा नेते अजिंक्य भैय्या माडगे मदनवाडी सामजिक कार्यकर्ते नानासाहेब बंडगर,तक्रारवाडी मां सरपंच सतीश वाघ इत्यादी यांनी दिले. सदर निवेदन मा. श्री अजितदादा पवार साहेब.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री साहेब ,महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32. मा. श्री तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय 32.. जिल्हाधिकारी पूणे, जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांना पाठवले आहे…