भिगवण स्टेशन येथे हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न..
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
भारतीय संस्कृतीत विवीध सन उत्सवानां अनन्य साधारण महत्त्व आहे. याच संस्कृतीचे रक्षण आणि जतन करणे जसे समाजाचे कर्तव्य आहे तसे ज्ञानमंदिराचे देखील आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानाबरोबर संस्काराची शिदोरी ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थी घडवणारे पालक देखील याबाबत जागृत करणे आजच्या आधुनिक काळात गरजेचे आहे.याच आदर्शने प्रेरित होउन आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण स्टेशन येथे हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सुमारे 60 ते 70 महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी भिगवण ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ.रतन ताई खटके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. विद्यालयाचे प्राचार्य भोसले व्ही.बी. व पर्यवेक्षिका सौ.सोनवणे एस.व्ही. यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सूरू झाला. यावेळी प्रास्ताविक सौ . सोनवणे मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू, पानसुपारी, तिळगुळ व संक्रांतीवाण देऊन त्यांचे यथोचित स्वागत केले. नंतर उखाण्यांच्या गोड जुगलबंदिने कार्यक्रम रंगतदार झाला. शेवटी श्रीमती देशमुख एस.ए . यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जाधव एम.ए .यांनी केले. विद्यार्थीनींनी या कार्यक्रमाचा उत्साहात आस्वाद घेतला तर उपस्थीत सर्व महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले.