देवदर्शनाबरोबर आपल्या भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला ते पुण्य लागेल कार्यकर्त्यांना दिला सल्ला;माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
(भिगवण येथे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न;राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने)
(निलेश गायकवाड)
भिगवण येथील ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिगवण व मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत आभा कार्ड करण्यात आले. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे.
भरणे यांनी शिबिराची पाहणी करत वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला.तसेच बोलताना सर्व कार्यकर्त्यांना सल्ला देखील दिला देवदर्शन बरोबर आपल्या भागातील व आपल्या परिसरातील गोरगरीब लोकांची सेवा करून आरोग्याची त्यांना सर्व सुख सुविधांची माहिती करून द्या .तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,मदनवाडी ग्रामपंचायत सरपंच नानासाहेब बंडगर, भिगवण ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत, माजी सरपंच हेमाताई माडगे, माजी उपसरपंच प्रदीप वाकसे, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजिंक्य माडगे,विद्यमान सरपंच कुंभरगांव उज्वला परदेशी,प्रमोद नरुटे, कायदेतज्ञ पांडुरंग जगताप,बापूराव थोरात,धनाजी थोरात,अमोल देवकाते, सुरेश बिबे,राजेंद्र देवकाते, तक्रारवाडी गावचे माजी सरपंच सतीश वाघ, नितीन काळंगे, सचिन आढाव,गणेश राक्षे,तहसीलदार श्रीकांत पाटील,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,सतीश शिंगाडे, विष्णुपंत देवकाते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.