मा आमदार शिरीष दादा चौधरी यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून अमळनेर विधानसभा मतदार संघातील प्रमुख विषयांवर चर्चा केली.
अमळनेर : विक्की जाधव..
सन २०२१ मध्ये अतिवृष्टी झालेल्या अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेबाबत. सन २०२३ मध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर झालेल्या अमळनेर व पारोळा / तालुक्यातील मंडळांना दुष्काळी तालुक्याच्या निकषांप्रमाणे सवलती मिळणे बाबत. सन २०२२-२३ मधील पारोळा तालुक्यातील बहादरपूर व शेळावे या मंडळातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमाची २५% अग्रीम रक्कम मिळणेबाबत.
अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या या तीन प्रमुख समस्या मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून निवेदनाद्वारे मांडल्या.या भेटीत मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अमळनेर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वरील तिन्ही प्रमुख समस्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली व योग्य पाऊल उचलण्याचे आश्वासन देत मुख्य सचिव व प्रशासनातील अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.