गरजू लोकांना योजनांचा लाभ मिळवून देत गावाचा विकास होणं गरजेचं-बीडीओ सुशांत पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

गरजू लोकांना योजनांचा लाभ मिळवून देत गावाचा विकास होणं गरजेचं-बीडीओ सुशांत पाटील

पिंपळे येथे मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, व प्रधान मंत्री आवास योजनेचे भूमिपूजन

अमळनेर-केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देत, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट होऊन विकास कामे गावात आणावेत असे आवाहन अमळनेर प स चे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी केले.
ग्रामस्थांच्या विविध योजना राबविण्या बाबत माहिती देताना ते बोलत होते.यावेळी मोदी आवास योजना,शबरी आवास योजना, व प्रधान मंत्री आवास योजनेचे भूमिपूजन बीडीओच्या हस्ते करण्यात आले.तसेच 45 घरकुलांना मंजुरी देण्यात आली,जास्त जास्त लोकांचे स्वप्न पूर्ण होवो अशी अपेक्षा बीडीओ यांनी व्यक्त केली. बीडीओ पाटील यांचा सत्कार तंटामुक्त अध्यक्ष निबा चौधरी यांनी केला इंजिनिअर रामकृष्ण पाटील ,इंजिनिअर तेजस वाघ व मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील,जयवंत पाटील,गोकुळ पाटील ,संतोष चौधरी,निबा चौधरी,राजेंद्र पाटील,गुलाब पाटील,भाऊसाहेब पाटील, नारायण पाटील ,भिका पाटील,विनोद पाटील,सुरेश पाटील,अनिल पाटील,प्रकाश पाटील,सखाराम पाटील,छोटु पाटील,सागर पाटील सर्व ग्राम पंचायत सदस्य व शिपाई ज्ञानेश्वर पाटील रोजगार सेवक संतोष पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!